मुंबई येथील मराठा आंदोलनाला जाऊन आलेल्या युवकांचा केम येथे सत्कार

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केम येथील युवक मुंबईला गेले होते. सरकारने आरक्षण संदर्भात अध्यादेश काढल्यानंतर सर्व आंदोलन कर्ते मुंबईहुन केमला परत आले. युवकांचे केम येथे आगमन होताच गावातील शिवसंभो वेसीवरिल राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या युवकांचा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने फेटा हार घालून करण्यात आला या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जरांगे पाटील झिंदाबाद अशाघोषणा देऊन फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.

या वेळी ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक सागर दोंड, युवासेनेचे तालुका समन्वयक सागर राजे तळेकर, संदिप तळेकर,हनुमंत खरवडे, विष्णू अवघडे, समीर भैय्या तळेकर, कांतीलाल दौंड,संदिप अरूण तळेकर,शिवाजी मोळीक, आदि उपस्थित होते.तसेच धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे वतीने राजे छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठ्यांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून डि,जे,च्या तालावर नाचून केला आनंद उत्सव साजरा केला.

