मानसिंग खंडागळे यांची सोलापूर लेबर सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड..
करमाळा / प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशन च्या 2023 – 24 ते 2028- 29 संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.नारायणतात्या खंडागळे यांचे चिरंजीव व करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक मानसिंग खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली होती. त्यानुसार 18 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 19 तारखेला अर्जाची छाननी होऊन 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत होती.
नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार करमाळा तालुक्यातून अर्ज दाखल केलेले दादासाहेब सावंत, शिवशंकर माने व बापूराव गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मानसिंग भैया खंडागळे यांचा यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मानसिंग खंडागळे यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आ. जयवंतराव जगताप तसेच करमाळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.