जमिनीच्या कारणावरून महिलेस मारहाण – चिखलठाण येथील घटना
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जमिनीच्या कारणावरून तिघा जणांनी महिलेस तसेच त्यांच्या मुलीस व मुलास लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता चिखलठाण परिसरात झाला आहे.
यात सुरेखा तुकाराम नेमाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की चिखलठाण येथील लांडहिरा भागातील ३० गुंठे जमिनीत माझ्या मुलांना हिस्सा दे म्हणून दीर बापूराव बाबा नेमाणे तसेच पुतण्या काळू बापूराव नेमाणे व तानाजी बापूराव नेमाणे हे घरासमोर आले. त्यावेळी मी त्यांना पूर्वी वाटप झालेले असताना आता तुम्हाला जमीन कशी वाटप करून देवू.. असे म्हणाले असता या तिघांनी शिवीगाळ करून हातातील लोखंडी गजाने व लाथाबुक्क्यांनी मला तसेच मुलगी अंजली नेमाणे व मुलगा मयुर नेमाणे यास मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला तपास सुरू आहे.