करमाळ्याच्या तहसीलदारपदी शिल्पा ठोकडे यांचा चार्ज कायम
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती परंतु नुकतेच वरिष्ठांकडून करमाळ्याच्या तहसीलदारपदीचा चार्ज कायम करण्यात आला आहे.
करमाळ्याच्या तहसीलदारपदीचा चार्ज शिल्पा ठोकडे यांच्याकडे कायम केल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने ठोकडे यांचा तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन सत्कार करण्यात आला.या वेळी राजाभाऊ कदम यांच्या समवेत बळीराम रोंगे, मचिन्द्र काळे, नावनाथ केवारे उपस्थित होते.
तहसीलदार ठोकडे यांची नियुक्ती होण्याआधी करमाळा तालुक्याला आठ-नऊ महिने अधिकृत तहसीलदार नव्हते. करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाले पाहिजेत यासाठी बहुजन संघर्ष सेनेने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
तहसीलदार शिल्पा ठोकडे करमाळ्याला आल्यापासून तहसील कचेरीतील सर्व कर्मचारी सुता सारखे सरळ झाले असून नागरिकांना व्यवस्थित सहकार्य करू लागले आहेत. तहसीलदार सर्व कर्मचाऱ्यांवरती स्वतः लक्ष ठेवून असल्याने कामाला गती आली आहे. अशा कर्तव्यदक्ष तहसीलदाराची करमाळ्याला गरज होती.
– राजाभाऊ कदम, जिल्हाध्यक्ष बहुजन संघर्ष सेना