हातभट्टी व देशीदारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : एकाच ठिकाणी बसून देशी व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या दोघांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून ३४१० रूपयाची दारू जप्त केली आहे.
यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश रामचंद्र गुटाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की पारेवाडी येथील कुंभेजफाटा रोडलगत हॉटेल शेजारी देशी व हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता तेथे गेलो असता तेथे रोहित लाला काळे व गणेश वसंत पवार (दोघे रा. पारेवाडी) हे देशी व विदेशी दारू विक्री करताना सापडले आहेत.
त्यांच्याकडे १ हजार रू. किंमतीची २० लिटर हातभट्टी दारू सापडली तर ९१० रू. च्या रूपयाच्या संत्रा कंपनीच्या १३ बाटल्या व १५०० रू. किंमतीच्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या १२ बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट तळेकर हे करत आहेत.