मोटारसायकल अपघातात महिलेचा मृत्यू – मुलाची वडीलाविरूध्द फिर्याद
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. ३०: मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात वृध्द महिला मरण पडली आहे. हा अपघात ७ जानेवारी २०२४ रोजी निंभोरे येथे घडला आहे. या प्रकरणी मुलांने मोटारसायकल चालक वडीलाच्या विरुध्द दिली आहे.
फिर्याद निंभोरे येथील नितीन अभिमान वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की माझे वडील अभिमान अर्जुन वाघमारे हे आमची मोटारसायकल क्रमांक एम.एच.४५ ए.टी. ११०२ वरून माझी आई शिवगंगा (वय- ६५) हिला घेऊन बहिण अश्विनी हिच्याकडे दिवेगव्हाण ला जावून येतो म्हणून गेले होते. त्यावेळी जाताना त्यांचा अपघात झाला. त्यात माझी आईला डोक्याला मार लागला होता. त्यानंतरही आई मुलीकड़े जायचे म्हटल्याने वडीलांनी आईला दिवेगव्हाण येथे नेले. दुसऱ्या दिवशी म्हटले ८ जानेवारीला तीला त्रास होवू लागल्यानंतर तिला करमाळा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. इथे उपचार होत नसल्याने तिला सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले पण उपचार सुरू असताना तिचे १० जानेवारला निधन झाले. माझे वडील अभिमान वाघमारे यांनी निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून अपघात केला व आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.