ढोकरी येथे चोरीची वाळू पकडली - ६६ लाख ५ हजाराचा ऐवज जप्त -

ढोकरी येथे चोरीची वाळू पकडली – ६६ लाख ५ हजाराचा ऐवज जप्त

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ढोकरी (ता.करमाळा) येथे उजनी जलाशयात वाळू चोरी करताना पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार २८ मार्च ला पहाटे दीडच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना बातमीदाराकडून ढोकरी येथे वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी पहाटे दीड वाजता पोहोचलो.

त्यावेळी उजनी जलाशयात राविवुल शेख, अमीर शेख, युसूफ शेख (सर्व रा. झारखंड) तसेच पप्पू राजेंद्र सल्ले (रा. खरोची, ता. इंदापूर) व विकास नवनाथ देवकर (रा.सरडेवाडी, ता. इंदापूर) हे बोटीतून वाळू काढत असताना आढळून आले. यातील विकास देवकर व पप्पू सल्ले यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी संबंधितांकडे १ लाख ५ हजार किंमतीची २१ ब्रास वाळू तसेच ५० लाख रू. किंमतीच्या दोन यांत्रिक बोटी व १५ लाख रू. किंमतीचा एक सेक्शन पाईप सापडले आहेत.

त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार अब्दुल माजीद काझी, मंडल अधिकारी प्रकाश जगताप, तलाठी संतोष कांबळे, गोरक्षनाथ ढोपणे, ज्ञानेश्वर बोराडे, आनंद डोणे यांचेकडे बोटी व सेक्शन पाईप दिला. त्यावेळी त्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने या वस्तू उध्वस्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!