कामोणे येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन.. - Saptahik Sandesh

कामोणे येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कामोणे (ता.करमाळा) येथे आज (ता.२३) बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके करून दाखवण्याचा कार्यक्रम व खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम, घरगुती बियाणे व इतर बियाण्यासाठी उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक मोहीम, खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण मोहीम, व जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत वापर प्रात्यक्षिक मोहीम व घरगुती बियाणे उगवणशक्ती क्षमता तपासणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी अधिकारी श्री. ए एस चव्हाण, कृषी पर्यवेक्षक एस जी गायकवाड, कृषी सहायक विजय सोरटे, व शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये ए एस चव्हाण यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय? बीज प्रक्रियेचे फायदे, जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया यामध्ये काय काळजी घ्यावी जसे की जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके बुरशीनाशके इत्यादी लावलेले असेल तर जिवाणू संवर्धके नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे, तसेच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकासोबत रायझोबियम, ऑझोटोबॅक्टर, स्पुरद विरघळणारे जिवाणू या जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करता येते.

बीजप्रक्रिया करण्याचा क्रम जसे की सर्वात आधी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर रासायनिक किटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर तीन ते चार तासांनी रायझोबियम/ ऑझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया करावी व सर्वात शेवटी स्पुरद विरघळणाऱ्या जिवाणूची बीजप्रक्रिया करावी इत्यादी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित शेतकरी बंधू यांना समजावून सांगितले. एस जी गायकवाड व विजय सोरटे यांनी बीज प्रक्रिया व उगवण शक्ती प्रात्यक्षिक करण्यासाठी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!