हवा भरण्याचे ‘कॉम्प्रेशर’ फुटल्याने युवक जखमी – दुकानदारावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : हवा भरण्याचे कॉम्प्रेशर फुटून त्याचा लोखंडी पत्रा उडून युवक गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार कोर्टी येथे ७ मे ला सकाळी साडेनऊ वाजता घडला आहे. या प्रकरणी नागन्नाथ महादेव वायदंडे (रा. कोर्टी ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ मे ला माझा मुलगा सुनील नागन्नाथ वायदंडे हा कामावर जाताना तुषार गणेश गिरी (रा. कोर्टी) याच्या पंक्चरच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेशर फुटले व त्याचा लोखंडी पत्रा उडून सुनील हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलला आणले आहे.

यात तुषार गणेश गिरी याच्या निष्काळजीपणाने माझा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!