केमच्या मयुरीने १२ वी सीईटी परीक्षेत मिळविले ९९.९३% गुण

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. मयुरी वसंत तळेकर हिने बारावी सीईटी परीक्षेमध्ये 99.93 % गुण मिळवून उतुंग यश संपादन केले. तसेच तिने केमिस्ट्री विषयात 100 पैकी 100 मार्क्स मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मयुरी ही पहिली ते दहावी राजाभाऊ तळेकर विद्यालयातच मराठी मिडीयम मध्ये शिकली असून तिने मराठी मिडीयम मध्ये राहून सुद्धा उत्तुंग यश मिळविता येते दाखवून दिले आहे. तिच्या या उत्तुंग अशा बद्दल तिचे व तिच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री महेश तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर शिवाजी प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.




