जेऊर येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये चिमुकल्यानी साजरा केला ‘योगा दिन’

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आज शनिवार, दिनांक २२ जून ला इरा पब्लिक स्कूल मध्ये “योगा दिन”साजरा करण्यात आला. या वेळी नर्सरी ते पहिली चे सर्व बाल चिमुकले या मध्ये अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना योगा दिनाविषयी चे महत्त्व घाडगे मॅडम व मिश्रा मॅडम यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव सुनील अवसरे, अवसरे मॅडम व इतर सर्व सहकारी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने योगा डे अतिशय आनंदात व उत्साहात साजरा झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवली व रोज योगा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या योगसाधनेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




