केम येथे फिरस्त्या कुत्र्यांचा पोल्ट्रीफार्म वर हल्ला - सुमारे ६५० पिल्ले मृत्यूमुखी -

केम येथे फिरस्त्या कुत्र्यांचा पोल्ट्रीफार्म वर हल्ला – सुमारे ६५० पिल्ले मृत्यूमुखी

0
फिरस्त्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली पिल्ले

केम (संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथे फिरस्त्या कुत्र्यांनी पोल्ट्री फार्म मध्ये घुसून कोंबड्यांवर केलेल्या हल्ल्यात दोन पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या शेतकऱ्यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अनेक पिल्ले कुत्र्यांनी फस्तगत केली असून हल्ल्यात सुमारे ६५० पिल्ले मृत्यूमुखी पडले आहेत. यातील एक घटना मागच्या आठवड्यात झाली तर दुसरी घटना काल (दि.२५) घडली आहे.

केम येथील मेघराज चव्हाण व विकास थोपटे यांच्या दोन पोल्ट्री केम-वडशिवणे रोडलगत आहेत. गावापासून यांचे अंतर एक किलोमीटर आहे. रात्रीच्या वेळेला चव्हाण हे पक्षाला चारा पाणी करून पोल्टी फार्मचे दरवाजे बंद करून घरी आले रात्रीच्या वेळी फिरस्त्या चार-पाच कुत्र्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये घुसून पक्षांना चावा घेऊन काही पक्ष्यांना फस्तगत केले. अंदाजे आठ हजारा रूपयापर्यंत नुकसान केले.

तसेच गेल्या आठवड्यात विकास थोपटे यांच्या सुमारे शंभर बाॅयलर कोंबड्या मारल्या. यात त्यांचे सुमारे दहा ते पंधरा हजारा पर्यंत नुकसान झाले आहे. या घटनेनंतर हा विषय केममध्ये चर्चेचा ठरला असून या फिरस्त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केम परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अगोदरच शेती तोट्यात आहे त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून मेघराज चव्हाण व विकास थोपटे यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. मेघराज चव्हाण या सुशिक्षीत बेकार तरूणाने कसे तरी पैसे उभा करून पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या मध्ये त्यांनी ५०० बाॅयलर व ५० गावरान कोंबड्यांची पिल्ले आणली. हि पिल्ले एक महिन्याची झाली होती हि पिल्ले दोन महिन्यांत विकायला आली असती कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे नुकसान झाले आहे. फिरस्त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व झालेली नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!