करमाळा येथील डॉ.प्रदिपकुमार जाधव-पाटील यांचे निधन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर व आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रदिपकुमार जाधव-पाटील यांचे आज (ता.३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून, अंत्यसंस्कार उद्या (ता.४) सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी तरटगाव (ता.करमाळा) येथे होणार आहे. डॉ.पाटील यांचे अंत्यदर्शन उद्या सकाळी अर्बन बॅंकशेजारील पाटील हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे. डॉ.जाधव-पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागात जावून सेवा दिली आहे, करमाळा तालुक्यातील तसेच बाहेरील तालुक्यातील रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. सर्पदंशावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे वडील कै. बुवासाहेब जाधव पाटील हे महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते. डॉ.जाधव-पाटील यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ संतोष जाधव-पाटील (आदिनाथचे माजी अध्यक्ष), मुलगा डॉ.रोहन जाधव-पाटील व उपसरपंच अभिजित जाधव-पाटील, पुतण्या अजिंक्य जाधव-पाटील, सून डॉ.शिवानी जाधव-पाटील, भावजई असा परिवार आहे. त्यांचे निधनानंतर तालुक्यातील अनेकांनी दु:ख व्यक्त केले. तसेच शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी श्रध्दांजली वाहिली.