वरकुटे जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न -

वरकुटे जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

0

करमाळा (दि.२९) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे या शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत यांचा सेवापूर्ती सोहळा वरकुटे (ता. करमाळा) येथे नुकताच संपन्न झाला. वरकुटे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने विद्वत यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

सेवानिवृत्तीच्या आयोजित समारंभात यश कल्याणी परिवाराचे गणेश करे-पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले की, विद्वत मॅडम यांनी एक आदर्श शिक्षिकेच्या भूमिकेतून गोरगरीब मुलांना मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी करण्याचा खूप मोठ काम त्यांनी केलेल आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली त्या ठिकाणी पालक ग्रामस्थांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. तसेच शाळा आणि गाव यामध्ये एकोप्याचे संबंध निर्माण करून शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या भविष्या बाबत कायम जागरूक ठेवण्याचे काम  त्यांनी केले. आपल्या सेवेमध्ये वेळप्रसंगी स्वतः काही मुलांच्या फी भरून त्यांना मदत करण्याच काम केलेलं आहे त्याचबरोबर आपले कार्य हे निरपेक्षपणे करत राहून त्यामधून समाजाची सेवा केली आहे हे सर्व करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कलागुणांना वाव देण्याचे काम केलेलं आहे सर्व शिक्षकांमध्ये सौदर्याचे वातावरण निर्माण ठेवून आपली शाळा कायम गुणवत्ता च्या आधारावर प्रथम कशी येईल यासाठी त्यांचा कायम प्रयत्न करायचा आणि त्यासाठी त्या अविरतपणे कार्य करत होत्या हे सर्व करत असतानाच त्यांना समाजातील असणाऱ्या वेगवेगळ्या संवेदना त्यांनी कवितेच्या रूपातून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा या सर्व गुण संपन्न विद्वत मॅडम सारखे शिक्षक नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरणार आहेत. 

यावेळी समितीचे माजी अध्यक्ष सचिन गात केंद्रप्रमुख दामाजी श्रीरामे, प्रसाद विद्वत, चंद्रहार चोरमोले, अश्विनी विद्वत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिव्यांग संघटना सोलापूरचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी सरपंच प्रतिनिधी दादा भांडवलकर केंद्रप्रमुख रामेश्वर लोंढे शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे सचिव नीलकंठ ताकमोगे माजी मुख्याध्यापक दत्तात्रय दास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  श्री गणेश जगताप सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत जाधव केंद्रातील मुख्याध्यापक अरविंद पाटील शिवाजी फरतडे त्याचबरोबर  निवृत्त पीएसआय देवराव सुकळे, निवृत्त पोस्टमास्तर हरी काका विद्वत उद्योजक संतोष काका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ. विद्वत यांच्या परिवारातर्फे उपस्थित सर्व मान्यवर यांना भारतीय राज्यघटना चे  संविधान पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गोसावी, प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय बेडकुते तर आभार सचिन देशमुख यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे शहीद नवनाथ गात मित्र मंडळ त्याचबरोबर कोटलिंग मित्र मंडळ वरकुटे यांनी विशेष प्रयत्न परिश्रम केले  यावेळी सालसे केंद्रातील  अनेक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!