प्रा.अश्विनी अशोक भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून पी. एच.डी प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : गुळसडी (ता.करमाळा) येथील रहिवासी प्रा.अश्विनी अशोक भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाकडून औषधनिर्माण शास्त्र या विषयांमध्ये पी.एच.डी प्रदान करण्यात आली. सिन्थसिस ऑफ फार्मकॉलॉजिकल स्क्रीनिंग ऑफ नोवेल कार्डिओवास्कयुलर हायब्रीड ड्रग्स हा त्यांचा पी. एच. डी चा विषय होता. त्याना डॉ. गणेश आंधळे आणी डॉ. राजेश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या त्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, बावधन, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक (औषधशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत.
प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरानगर, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) येथून त्यानि बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण केली आहे.
सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव (बीके), पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) येथून मास्टर ऑफ फार्मसी पूर्ण केले आहे. तर सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथून कायद्याचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. क्लिनीटेक सपोर्ट इंडिया, पुणे येथून वैज्ञानिक आणि वैद्यकीय लेखनाचा पीजी डिप्लोमा पूर्ण केला आहे.
PCI अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी फार्मास्युटिकल इनऑर्गेनिक केमिस्ट्री आणि फार्मास्युटिकल ॲनालिसिस ही दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
नावाखाली दोन पेटंट मंजूर आहेत. त्यांनी जवळपास 50 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. मी एकूण ६ Master of Pharmacy विद्यार्थ्यांना आणि 11 Bachelor of Pharmacy विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
नॅनो फॉर्म्युलेशन आणि अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीकॅन्सर एजंट्ससाठी पॉलिमर अभ्यास हे संशोधनाचे मुख्य क्षेत्र आहे.
प्रा. अश्विनी भोसले- यांनी फुफुसावरील कर्करोगाच्या मृत पेशी शोधून काढणारे यंत्र बनवले असून त्याचे पेटंट प्रा. अश्विनी भोसले यांना भारत सरकारकडून बहाल करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे यंत्र तयार केले आहे. ईतभर लांब व रुंद असे आयताकृती हे यंत्र बनवले आहे. कॅन्सर च्या डेड सेल (कर्करोगाच्या मृत पेशी) फुफुसात आढळून आल्यास हे यंत्र सतर्क करण्याचे काम करते.

या यंत्राद्वारे फुफुसातील कर्करोगाच्या मृत पेशीचे कोणतीही चिरफाड न करता निदान केले जाते. त्यामुळे फुफुसाला जर कर्करोगाची लागण झालेले आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्याने तो तात्काळ बराही होऊ शकतो. ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रा अश्विनी भोसले यांनी समाजोपयोगी व आरोग्यदायी हे यंत्र तयार केले आहे.
प्रा.अश्विनी भोसले यांनी याबाबतच्या पेटंट साठी कोलकत्ता येथे पेटंट कार्यालयात नोंदणी केली होती. त्यांनी याला “स्मार्ट लंग कॅन्सर डिटेक्टिंग डिव्हाईस” असे नाव दिले आहे. याची उपयुक्तता सिद्ध झाल्याने संशोधित यंत्राची दखल घेऊन प्रा.अश्विनी भोसले यांना ‘दि पेटंट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ कडून या संशोधित डिव्हाईसला मान्यता दिली. त्यांच्या या गौरवस्पद कार्याची दखल भारत सरकारने घेऊन यासाठी सरकारने पेटंट बहाल केले आहे. याबरोबरच प्रा.अश्विनी संदिप ओहोळ यांना लंडन येथून ” पोर्टेबल डिवाइस यूज्ड फॉर बोन कॅन्सर डिटेक्शन” यासाठी त्यांना “इन्टेइलुक्चल प्रॉपर्टी ऑफिस युनायटेड किंग्डम (लंडन)” येथून पेटंट मिळाले आहे.






