कंदर च्या उपसरपंच पदी उदयसिंह शिंदे यांची बिनविरोध निवड..

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे.. करमाळा तालुक्यातील कंदर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी उदयसिंह नवनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.. अमोल भांगे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेसाठी सत्ताधारी गटाच्या उदयसिंह नवनाथ शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे लोकनियुक्त सरपंच मौला साहेब मुलानी माजी सरपंच आजिनाथ शिंदे मावळते उपसरपंच अमोल भांगे अण्णा पवार माजी उपसरपंच आकलाख जहागिरदार संपत सरडे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे आबासाहेब सुरवसे राजकुमार सरडे सुहास कदम नानासाहेब लोकरे संभाजी लोंढे आदी उपस्थित होते .. उपसरपंच बिनविरोध निवडीनंतर उदयसिंह शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व गुलालाची मुक्तपणे उधळण करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.






