विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणे काळाची गरज – प्रा.नंदकिशोर वलटे

करमाळा(दि.१८): सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञान साक्षर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये पोथरे (ता. करमाळा) येथे आयोजित व्याख्यानामध्ये प्राध्यापक नंदकिशोर वलटे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पोथरे तालुका करमाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दररोज एक व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. काल तंत्रज्ञान शिक्षण काळाची गरज या विषयावर व्याख्यान देण्यासाठी व्याख्याते प्राध्यापक नंदकिशोर वलटे यांना निमंत्रित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे हे होते तर विचार मंचावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक कृष्णा कांबळे हे होते पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक मुळीक यांनी करून दिला प्रस्ताविक प्राध्यापक सोनवणे यांनी मांडले तर आभार प्राध्यापक विटूकडे सर यांनी मांडले यावेळी इतिहास विभागाच्या प्राध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित होत्या अध्यक्षीय भाषणात सरपंच अंकुश शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात सक्रिय होऊन समाज परिवर्तन करण्याचा सल्ला दिला तर व्याख्याते वलटे यांनी तंत्रशिक्षण काळाची गरज असल्याचे पटवून दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्व विषयाचे बेसिक ज्ञान घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा संदेश दिला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधून मिळणारे संस्कार आयुष्यभर उपयोगी येतात म्हणून प्रत्येकाने हे श्रम संस्कार समाज हितासाठी वापरावेत असे सांगितले.





