पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची सांगोला येथे बदली

करमाळा(दि.२०): सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांची विहीत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचाही समावेश आहे.


पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली सांगोला पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर करण्यात आली असून, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची करमाळा पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. श्री. माने यांनी आजपासून कार्यभार स्वीकारला आहे.
विहित कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पोलीस निरीक्षक घुगे यांची बदली झाल्याने या बदलीमागे काही राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.





