जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘पुस्तकाने मला काय दिले?’ या विषयावर करमाळ्यात व्याख्यानाचे आयोजन

0

करमाळा (दि.२१) : करमाळा नगरपरिषदेचे श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर (मुक्तद्वार वाचनालय) येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता “पुस्तकाने मला काय दिले?” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. नवनाथ लोंढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. ते आपल्या व्याख्यानातून वाचनसंस्कृती, ग्रंथप्रेम आणि पुस्तकांच्या प्रभावावर प्रकाश टाकणार आहेत.

करमाळा शहरातील सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!