काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा करमाळा मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध

करमाळा(दि. २५) : काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सकल मुस्लिम समाज, करमाळा यांच्यावतीने आज तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू व अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त धक्कादायक असून, ही मानवतेची हत्या असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

आज शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी आपल्या हातावर काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा केली. मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. तसेच जखमी नागरिकांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन, करमाळा व सकल मुस्लिम समाज, करमाळा यांच्यावतीने भारत सरकारकडे हल्लेखोर दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या वेळी जमियत उलेमा-ए-हिंद चे मौलाना मोहसीन, आयशा मशीदचे अबु रेहान, मक्का मशीदचे मौलाना सिकंदर, जामा मशीदचे मौलाना अन्वर, मौलाना सय्यद अली, मौलाना मोहम्मद फारुख रझा, तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल, समीर बागवान, मजहर नालबंद, आल्लाऊद्दीन शेख, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, आलीम शेख, नजम शेख, अनवर शेख, अकीब सय्यद, हाजी इम्रान, आजीम शेख, अस्लम बेग, कबीर भाऊसाहेब, सद्दाम कुरेशी, अफजल शेख, जाकीर वस्ताद, अरबाज घोडके, जाकीर पठाण, अशरफ तांबोली, हाफीज अब्दुल्ला, सरफराज पठाण, सरफराज सय्यद, सुहेल मुलाणी, इस्राईल राज, आमन शेख, अमीर वस्ताद यांचा समावेश होता.




