करमाळा लोकअदालतमध्ये दाखलपुर्व व प्रलंबित 532 प्रकरणे निकाली..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा येथील न्यायालयात झालेल्या लोकअदालतमध्ये एकुण 532 प्रकरणे निकाली निघाली आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच जिल्हा प्रमुख तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यु.पी.देवर्षी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस एम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती करमाळा व तालुका वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 10 मे रोजी सकाळी 10:30 वाजता ” राष्ट्रीय लोकअदालत ” याचे आयोजन न्यायालयात करण्यात आले होते.

यावेळी या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण 532 प्रकरणे निकाली निघाली असून, यामध्ये जवळपास 24,84,4433/- वसुली करण्यात आली. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस एम घुगे तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती बागडे तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.ए.बरडे व उपाध्यक्ष ॲड.एस.ए.रोकडे व इतर करमाळा बार असोसिएशन चे सर्व सद्स्य उपस्थित होते. यावेळी दोन पॅनल करण्यात आले होते.

सदर दाखल प्रकरणात एकूण 6510 प्रकरणे ठेवलेली होती त्यातील 532 प्रकरणे निकाली करण्यात आली. त्याची रक्कम रुपये 24,84,4433/- वसुली करण्यात आली. दाखल पूर्व प्रकरणे 2999 ठेवलेली असून त्यातील 495 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये रक्कम रुपये 76,63,641/- वसुली करण्यात आली. यामध्ये एकूण संपूर्ण निकाली प्रकरणे 6510 पैकी 532 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये एकूण रक्कम रुपये 24,84,4433/- वसुली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!