करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित अहिल्यादेवींना मानवंदना -

करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित अहिल्यादेवींना मानवंदना

0

करमाळा (दि.६): पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त करमाळा तालुक्यात सकल धनगर समाजाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतून  अहिल्याबाईंच्या कार्याची आठवण करून देत सामाजिक एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श नेतृत्वाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.

तुलशीवृंदावन देवीचारोड येथे प्रतिमा पूजन व चौंडी यात्रेकरूंना सुविधा

तुळशीवृंदावन देवीचारोड येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, माजी सभापती शिवाजीराव बंडगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, तसेच विविध पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी के. हाइट्स बायपास येथे दिवसभर थंड पाणी व नाश्त्याचे वाटप विविध कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

रुग्णालय, वृद्धाश्रम व गोशाळेत सेवाभावी उपक्रम

सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा कुटीर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच पांजरपोळ गोशाळेतील भाकड जनावरांसाठी ओल्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले.

मातोश्री वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांना नाश्ता व जेवण देण्यात आले. या ठिकाणीही राजमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मान्यवरांचे मनोगत

कार्यक्रमांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, चेअरमन दिग्विजय बागल,प्रा. शिवाजीराव बंडगर,सुनील बापू सावंत, संजय घोलप,संतोष वारे, अर्जुन गाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या समाज सुधारणेतील आणि प्रशासकीय कार्यातील योगदानावर भाष्य केले.

यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांचे योगदान

कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी प्रविण होगले, विनोद महानवर,बाळासाहेब टकले, अंगद देवकते, इंजि. शुभम बंडगर, बापू शिरगीरे, सुशील नरुटे,राहूल चोरमले,किरण केसकर, भिवा वाघमोडे, विकास मेरगळ, बाबासाहेब चौगुले, आशिष बंडगर, विष्णू वाघमोडे, भिवा वाघमोडे, माऊली सलगर, विशाल पाडसे, विकी शिंदे, पप्पू चोरमले,अण्णा सुपनर, चंद्रहास चोरमले, संदीप मारकड, बाळासाहेब मोटे, किशोर शिंदे, सतीश नरुटे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मान्यवरांची उपस्थिती :

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,आदिनाथ कारखाना संचालक राजाभाऊ कदम, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप,गजानन ननवरे, जयकुमार कांबळे, गुरूकुल चे नितीन भोंगे,आदेश कांबळे, पत्रकार जयंत दळवी, विशाल घोलप, सुनील भोसले, डीजीटल मीडीया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके, भरतकुमार गांधी, जयंत काळे, कुमार पलंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, स्री.रोग तज्ञ डॉ. निलेश मोटे, डॉ. अशोक शेळके, डॉ. हेमंत पांढरे, डॉ.अमोल डूकरे, भाजपा कि.मो.जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, हभप संतोष आरणे महाराज,मल्हारी मारकड, मातोश्री वृद्धाश्रम चे अध्यक्ष बाळासाहेब गोरे,विष्णू रंदवे, रामराजे वाघमोडे, सतीश मोटे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!