यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

करमाळा (प्रतिनिधी) – विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थी व शिक्षक वर्गाने सक्रिय सहभाग घेतला.
या प्रसंगी विद्या विकास मंडळाचे मानद सचिव श्री. विलासरावजी घुमरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. संभाजी किर्दाक हे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी योग प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक देत योगाच्या सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व पटवून दिले.
या योग दिनात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), तसेच अकॅडमीचे विद्यार्थी आणि यशवंत परिवारातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने योगासने करत आरोग्यविषयक सजगतेचा संदेश दिला
