उमरड जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा -

उमरड जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0

करमाळा (प्रतिनिधी) –दिनांक २१ जून २०२५ रोजी उमरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.

कार्यक्रमात श्री. अनिल यादव यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “योग केवळ व्यायाम नसून तो संपूर्ण मानव कल्याणासाठी एक समग्र प्रणाली आहे.” योग शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक आरोग्याच्या सर्व पैलूंना स्पर्श करतो, हे विद्यार्थ्यांना उदाहरणासहित समजावण्यात आले.

यंदाच्या योग दिनाची ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली. या थीममधून वैयक्तिक आरोग्य व पृथ्वीच्या शाश्वततेतील परस्परसंबंध स्पष्ट केले गेले. “आपले अंतर्गत आरोग्य आणि पृथ्वीच्या आरोग्यातील संबंध समजून घेणे ही काळाची गरज आहे,” असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शालेय आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काका कोठावळे, मुख्याध्यापक अंकुश अमृळे, शिक्षक दिलीप भोसले, संदीप ढाकणे, बापूसाहेब भोसले, मुकुंद राऊत, मेघना साळुंखे, तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना दररोज घरीही योगासन व प्राणायाम नियमित करण्याचे आवाहन करून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!