अर्जुननगर फाटा येथे बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल -

अर्जुननगर फाटा येथे बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

करमाळा(प्रतिनिधी)- हॉटेलच्या आडोशाला बसून दारू विक्री करणाऱ्याला करमाळा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील गजबजलेल्या अर्जुननगर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.



याबाबत पो.कॉ. बापूसाहेब कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१८/०६/२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अर्जुननगर फाटा येथील हॉटेल राजपॅलेसच्या बाजुच्या भिंतीच्या आडोशाला आरोपी हणुमंत रामभाऊ रोकडे (वय-३६ वर्षे, रा. फिसरे ता. करमाळा) हा पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये विविध कंपन्यांच्या रु.३९१० किंमतीच्या एकूण १७ दारूच्या बाटल्या बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत पोलिसांना मिळून आला आहे.

पो.कॉ. कोकाटे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी हणुमंत रामभाऊ रोकडे याच्या विरुद्ध दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पो.हे.कॉ. मयुर गव्हाणे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!