युवकावर कोयत्याने हल्ला- करमाळा शहरात खळबळ -

युवकावर कोयत्याने हल्ला- करमाळा शहरात खळबळ

0


करमाळा /संदेश  प्रतिनिधी
करमाळा,ता.२५ : शहरातील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात एका युवकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना २२ जुन रोजी रात्री पावणेनऊ वाजता घडली आहे.
यात  महेश दत्तात्रय आलाट रा.रोशेवाडी (ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले की, मी शिक्षणासाठी पुणे येथे राहत असून सुट्टीसाठी गावी आलो होतो. दि. २२ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास मी संचेती किराणा दुकानासमोर माझ्या चुलत भावासोबत बोलत उभा असताना, आकाश धनंजय मंडलिक (रा. आण्णाभाऊ साठे नगर, करमाळा) याने मागून येत कोयत्याने हल्ला केला करुन जखमी केले. सुरवातीला त्यांने प्रथम पाठीवर वार केला. त्यानंतर पुन्हा कोयत्याने डाव्या हाताच्या पंजावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी महेश आलाट याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आकाश मंडलिक हा नशा करत असल्याचा संशय असल्याने व  त्याबाबतची माहिती त्याच्या भावाला दिल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!