पत्रकारांना शिवीगाळ व धमकीप्रकरणी करमाळा पोलिसांकडे निवेदन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
, करमाळा, ता.२६ : मुंबई येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा निषेध करमाळा पत्रकार संघाने करून संबंधित खासदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून त्याचे निवेदन करमाळा पोलीसांना देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून पत्रकार संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पत्रकारांना धमकावणे व अपमानास्पद भाषा वापरणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारे कृत्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी संबंधित खासदाराविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पत्रकारांना संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या सह्या आहेत.
