वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करत वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश -

वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करत वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश

0

केम(संजय जाधव)- केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करून तसेच वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

गतवर्षी वटपौर्णिमेनिमित्त लावलेल्या वडाच्या झाडांची विधिवत पूजा करण्यात आली. झाडांची आकर्षक सजावट करून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर परिसरात नव्या वडाच्या रोपाची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा संकल्पही करण्यात आला.

यावेळी प्राचार्य माधव बेले यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वडाच्या झाडाचे पर्यावरणीय, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून असलेले असाधारण महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमासाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. एस. के. पाटील, प्रा. सतीश बनसोडे तसेच वस्तीगृह अधीक्षक सागर महानवर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास इयत्ता बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!