शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार गुंड यांची निवड

केम(संजय जाधव): महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सोलापूर माध्यमिक जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार गुंड तर प्राथमिक शिक्षक जिल्हाध्यक्षपदी देवदत्त मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली
मुंबई येथे शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच या वेळी सोलापूर जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्ष पदी गोरख ढेरे, जिल्हा सरचिटणीस पदी सचिन गाडेकर, प्राथमिक सरचिटणीस पदी नितीन रूपनवर कार्याध्यक्ष गायकवाड करमाळा, ता, अध्यक्ष पदी इरफान काझी माढा तालुका ध्यक्षपदी उल्हास उबाळे यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या.
या निवडी प्रसंगी गुंड सर म्हणाले शिक्षकांच्या हक्का साठी सदैव प्रयत्नशील राहिल व शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर हि संघटना काम करेन.
