कै. शिवाजी टेकाळे सोशल फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.5: पांगरे येथील कै. शिवाजी बलभीम टेकाळे सोशल फाऊंडेशन,च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरे येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व साहित्याचे मोफत  वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी नितीन तकीक, पांगरे शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष महेश शेळके,उपसरपंच  महेश टेकाळे, पांगरे सोसायटीचे उपाध्यक्ष  बाळासाहेब गुटाळ, मा.उपसरपंच  गणेश वडणे,  अरुण शेंडगे,बाळासाहेब काळे. विवेक पाटील, नाथा सुतार आदी  मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात  शिक्षक तथा नुकतीच केंद्रप्रमुख पदावर निवड झालेल्या श्री. घोगरे यांचा विशेष  सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास  ग्रामस्थ, युवक, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात कै.शिवाजी टेकाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने संचालक भैरवनाथ टेकाळे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!