जुन्या नाण्यांना 65 लाख रुपये मिळवून देतो म्हणत व्यावसायिकाची ₹1 लाख रुपयाची फसवणूक

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : फेसबुकवर जुन्या नाण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या पेजच्या माध्यमातून संपर्क साधून 65…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : फेसबुकवर जुन्या नाण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या पेजच्या माध्यमातून संपर्क साधून 65 लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत कामोणे येथील गौतम अजिनाथ रंधवे यांची 100,736 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. कामोणे येथील श्री. रंधवे हे फेसबुकवर जुन्या नाण्यांची खरेदी करणारे एक पेज फॉलो करत होते. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने स्वतःचे नाव राज ग्यानी (रा. दिल्ली) असे सांगून त्यांच्याशी संपर्क साधला. रंदवे यांच्याकडील जुन्या नाण्यांचे व आधारकार्डचे फोटो व्हॉट्सॲपवर मागवून घेतल्यानंतर त्या नाण्यांच्या बदल्यात 65 लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले.

यानंतर रजिस्ट्रेशन फी व इतर शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या फोनपे स्कॅनरवर पैसे भरण्यास सांगण्यात आले. 20 जून ते 23 जून 2026 या कालावधीत फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ₹1,00,736 रक्कम ऑनलाइन पाठविली. रक्कम पाठवल्यानंतरही संबंधिताने आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर 65 लाख रुपये मिळणार नसल्याचे सांगितल्याने आपली फसवणूक झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!