विविध सामाजिक उपक्रम राबवून ॲड. राहुल सावंत यांचा वाढदिवस साजरा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवुन हमाल पंचायतचे अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड.राहुल सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने श्री.सावंत यांच्या भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी यश कल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड बाबुराव हिरडे, नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, अध्यक्ष महेश चिवटे, आदिनाथ सह. सा. का. चे संचालक डॉ. हरिदास केवारे , करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय दोशी, कृ.उ.बा.समिती चे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ, चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी सभापती किसन शिंदे, आदिनाथ सह. सा. का. चे माजी संचालक विठ्ठल शिंदे , भरतभाऊ आवताडे, शहाजी झिंजाडे, भगवान वायकुळे, चेअरमन वंदन नलवडे , माजी सरपंच सुग्रीव नलवडे,
डाॅ सुभाष शेंद्रे, संचालक मयूर दोशी, अध्यक्ष कन्हैयालाल देवी, मिलिंद शेठ दोशी, विकी शेठ मंडलेचा, उत्कर्ष गांधी, परेश शेठ दोशी, माधव दादा नलवडे, मानसिंग भैया खंडागळे , प्रकाश झिंजाडे , माजी सरपंच बाळासाहेब काळे, नामदेव शेगडे भाऊ, चेअरमन शहाजी शिंगटे ,जनार्दन नलवडे, सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, श्याम भाऊ झिंजाडे , दौलत वाघमोडे, विकी वाघमोडे, संतोष अण्णा वाघमोडे, आनंद मामा भांडवलकर, सरपंच केशव शेळके, सुरेश आण्णा भोगल , माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक महादेव फंड, नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेवक राजू आव्हाड,गोविंद किरवे, खलील मुलाणी, रवी जाधव, गोरख जाधव, माजी सरपंच राजू घाडगे, तुषार शिंदे, रामभाऊ गायकवाड,
सरपंच मोरे भाऊसाहेब, देवीदास वाघ, चेअरमन गुलाब भोगे, सरपंच प्रकाश थोरात, नाना अनारसे, भागवत वाघमोडे, सतीश मोटे, महादेव वायकुळे, बबन वायकुळे, पंडित कावळे, बंडू भागडे, सरपंच महेश सोरटे, रामभाऊ भागडे, सरपंच बाळू मोटे, डॉ. रोहन जाधव पाटील, सुदाम पाटील, बाळू चोरमोले, महादेव होगले, भाऊ पाटील, विलास डिसले, विश्वास काका बागल, उमेश बागल, पत्रकार अशोक मुरूमकर, पत्रकार अलीम शेख , पत्रकार दिनेश मडके , पत्रकार अशोक नरसाळे , पत्रकार अश्पाक सय्यद, पत्रकार सुनील भोसले, नाना मोरे, हभप मच्छिंद्र शंकर आदी जणांच्या उपस्थित झाला.
वाढदिवसानिमित्त सकाळी उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले ; यावेळी डाॅ महेश अभंग, डॉ शिंदे, सिस्टर ढाकणे, विठ्ठल राव रासकर, वालचंद रोडगे , सोपान काका बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर एकलव्य आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप रामकृष्ण माने, नगरसेवक संजय पप्पू सावंत, मनोज गोडसे, देवा लोंढे, विशाल गायकवाड, भीमराव लोंढे, ॲड. प्रशांत बागल , पत्रकार किशोर शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीदेवीचामाळ येथील मूकबधिर शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ह भ प विलास जाधव, ह भ प हनुमंत काळे, सरपंच भाऊसाहेब काळे , श्रीराम फलफले, अतुल मुरूमकर, रेवन मुरूमकर, बाळासाहेब दळवी, दिपक वाघमोडे, शिवाजी शिंदे आदी जण उपस्थित होते.
तसेच जामखेड रोड शेजारी माळवाडी रोड येथे डॉ. निलेश मोटे, सरपंच सरपंच भोजराज सुरवसे, व्यापारी किरण सावंत, माजी नगरसेवक गोविंद किरवे, दिपक सुपेकर, बंडू अडसूळ, आकाश कुरकुटे, विशाल रासकर , बापू उबाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सावंत गल्ली, करमाळा येथे ॲड. राहुल सावंत यांचा हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महेश चिवटे म्हणाले की, कै.सुभाष आण्णा सावंत यांनी अन्याय विरोधात वाचा फोडण्याचे जे काम केले ते काम आता ॲड. राहुल सावंत करत असून यापुढे त्यांनी अधिक जोमाने समाजकार्य करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विकासाच्या मुद्द्यांवर काम करावे व त्यांची निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे काम करावे असे त्यांनी म्हटले.
यावेळी गणेश करे पाटील म्हणाले की, ॲड. राहुल सावंत हे अभ्यासू नेते आहेत, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास करत करत ज्वलंत प्रश्नांना सामोरं जाण्याची संघर्ष करण्याची, लोकांना संघटीत करण्याची हातोटी वृत्ती त्यांच्या स्वभावात आहे. यापुढेही असेच लोकांच्या सुख दुःखात सामील होऊन लोकांचे अडीअडचणी सोडविण्याचे कार्य कै.सुभाष आण्णा प्रमाणे चालू ठेवावे असे ते म्हणाले. तसेच यावेळी ॲड.डॉ. बाबुराव हिरडे यांनी मनोगतामध्ये आगामी काळात तालुक्यातील विकासात्मक समाजकारण व राजकारणामध्ये सावंत कुटुंबीयांचा मोठा सहभाग निर्माण होत असल्याचे सूतोवाच केले, त्यादृष्टीने ॲड. राहुल सावंत यांनी ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून कामे केली आहेत. त्यांनी यापुढेही अशाच पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहचून ग्रामीण भागात विविध योजना राबवाव्यात.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राहुल सावंत म्हणाले की, तुम्ही माझ्यावर जो कौतुकाचा वर्षाव केला. यामुळे मला समाजकारण करण्यासाठी आणखी बळ मिळाले. यापुढेही आपला असाच स्नेह, प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा अशी सदिच्छा व्यक्त केली. या नागरी सोहळ्याप्रसंगी सचिन काळे, ॲड. अजित विघ्ने, अजय बागल, सरपंच गौतम ढाणे, नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी, बबन मुरूमकर, भीमराव लोंढे, ह भ प हनुमंत काळे, विलास जाधव, जान्हवी राहुल सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुका हमाल पंचायत चे उपाध्यक्ष गजानन गावडे , ज्ञानेश्वर गोसावी, राजेंद्र कांबळे, दिनेश क्षीरसागर, दिनेश माने, साईनाथ कांबळे, शकील शेख, शिवाजी आवटे, दादा शिंदे, संजय गायकवाड, शरद वाडेकर, समाधान सुरवसे, भारत सुरवसे, नागेश उबाळे, पै गणेश सावंत. आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. बलवंत राऊत यांनी केले तर आभार सुनील बापू सावंत यांनी मानले. दिवसभरात आमदार संजय मामा शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य वामनदादा बदे , विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, चेअरमन शिवाजी बंडगर सर ,सूर्यकांत पाटील , माजी सरपंच दिनेश भांडवलकर, चेअरमन चंदू काळे, पंचायत समिती सदस्य विलास मुळे, दत्तात्रय जाधव, व्हॉईस चेअरमन चिंतामणी दादा जगताप, संचालक शशिकांत केकाण, संचालक संतोष वारे, ॲड नानासाहेब शिंदे, ॲड सुहास मोरे, ॲड बाबा रोकडे, विलास बरडे, पै. सुधाकर काका लावंड, संदिप शेळके, ब्रह्मदेव राख, सरपंच साबळे, सदस्य नवनाथ नागरगोजे, सुरेश फुंदे, माजी चेअरमन संतोष अण्णा पाटील, डॉ. वसंतराव पुंडे, धुळा भाऊ कोकरे, कोळेकर साहेब, बाळासाहेब टकले, शंकर सूळ, बार्शी बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, डॉ. प्रशांत करंजकर, पोलीस सहाय्यक निरीक्षक धनंजय देवडीकर , अध्यक्ष प्रतापराव जगताप, मदन काका देवी, चेअरमन परमेश्वर भोगल, श्रीराम भोगल, सुनील फुलारी, पत्रकार नाना घोलप, चेअरमन सुजित बागल , रोहिदास रोडगे, पांडुरंग भांडवलकर, जावेद पठाण, दिलीप गावडे, अतुल थोरवे, बापू बेंद्रे, राहुल शिंदे, सरपंच रवी घोडके, तात्या पाटील, अमोल परदेशी, जगताप, सुनील कामटे व असंख्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.