कंदरच्या सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान.. - Saptahik Sandesh

कंदरच्या सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान..

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : कंदर (ता करमाळा) येथील लोकनियुक्त सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
करमाळा तालुक्यातील कंदर गावच्या महिला सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांच्या कार्याची दखल घेऊन आणि त्यांनी कंदर येथे राबविलेल्या विविध विकास योजना, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन स्किम, कोरोना काळात नागरिकांना दिलेली विशेष आरोग्य माहीती आणि मदत यामुळे त्यांची दखल घेऊन राज्यातील अशा अकरा ग्रामपंचायती मधे कंदर गावची निवड होऊन त्याचे पुस्तकरूपी माहीती पुस्तिकेचे प्रकाशन पुणे येथील पत्रकार भवन येथे झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते सरपंच मनिषाताई भांगे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन विशेष अभिनंदन होत आहे. याप्रसंगी कंदरच्या सरपंचाचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!