तुमच्या शेत जमिनीचा नकाशा पहा तुमच्या मोबाईल मध्ये
आपल्या शेतजमीनचा नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर ब्राउजर (उदा. गुगल क्रोम ) चे अँप्लिकेशन सुरू करावे लागेल. त्यामध्ये mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं टाईप करून सर्च करा. त्या नंतर डाव्या बाजूला तीन रेषा असलेल्या मेनू वर क्लिक करायचं.
त्यानंतर ‘राज्य’ सिलेक्ट करायचं. त्यानंतर ‘कॅटेगिरी’ निवडायची. कॅटेगरीमध्ये ‘रुरल’/’अर्बन’असे दोन प्रकार आहेत. जर ग्रामीण भागातील नकाशा पाहायचा असेल तर ‘रुरल’ असे निवडायचे तर शहरी भागासाठी ‘अर्बन’ निवडायचे.त्यानंतर तुमचा जिल्हा,तालुका,गाव निवडायचा आहे. त्यानंतर तिथे “सर्च बाय प्लॉट नंबर” असा रकाना आहे. या ठिकाणी तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट नंबर टाकायचं.
त्याच ठिकाणी डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहेत,त्या शेतकऱ्याचे नाव व त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.त्याच नकाशा मध्ये तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमीनीचे गट क्रमांक दिलेले असतात.
✍️ तुषार तळेकर, केम ( ता. करमाळा) मो.
९४०५२०३८९७