करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.विलास चौधरी यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ व माजी अध्यक्ष ॲड.विलास शंकरराव चौधरी (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी (ता.४) निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे, करमाळा बार असोसियेशनचे सहसचिव ॲड.विनोद चौधरी यांचे ते वडील होते. त्यांचेवर चौधरीवस्ती (झरे, ता.करमाळा) येथे आज (ता.४) रात्री १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.