चांगदेव हुंबे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन – वृक्षारोपण करून आठवणींचे केले जतन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथील चांगदेव माहिपती हुंबे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. याप्रसंगी अस्ति विसर्जन न करता वृक्षारोपण करून आठवणींचे केले जतन केले आहे.
अतिशय कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाचे चांगदेव हुंबे हे मांजरगाव आणि परिसरात चांगदेवतात्या या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या पाठीमागे त्यांचे बंधू दत्तू हुंबे,मुलगा बाळू हुंबे,नातू अक्षय,राघू व गणेश हुबे यांनी माती सावडण्याच्या दिवशी वृक्षातळी त्यांची रक्षा विसर्जन केले. त्याजागी आम्रवृक्षाचे रोपन करून पर्यावरण संरक्षणाचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पोलिस सेवेत असलेले चांगदेव तात्यांचे नातू अक्षय बाळू हुंबे हे म्हणाले की,मांजरगाव आणि परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अंत्यसंस्कार प्रसंगी स्मृती वृक्ष लावण्याची परंपरा सुरू आहे. ती अत्यंत आदर्श आणि पर्यावरणपूरक स्वरूपाची आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.