९६ पायरी विहीर

अशी ही करमाळा नगरी.
रावरंभा ची जहागिरी
अन विहीरी ला ९६ पायरी.
कमला भवानी ची कृपा झाली पदरी
देवी मंदिर भरतंया नजरी
नवराञ विजया दशमी होते साजरी
९६ खांब मंदिरा बाहेरी
९६ कुळाची एक एक पायरी
कमला भवानीच्या करमाळा माहेरी
करमाळ्याचा देवीचामाळ
रावरंभाचा सुवर्णकाळ
स्वराज्यात जोडली नाळ
९६ पायरी विहीर
रावरंभा शुरवीर
करमाला नगरी ला दिला धीर
९६ पायरी विहीर
तिला नाही झाकण
कमला भवानीची राखण
रावरंभा निंबाळकरांची शान
असा अभिमान भगवा चा वाढू दे मान.
✍️अतुल ठाकर, जेऊर, ता.करमाळा मो.9284173832
