२५ वर्षांपासून प्रलंबित असलेली केमची श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत होणार सुरू – भूखंडाचे केले वाटप
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या नामफलकाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. याच वेळी उद्योजकांना भूखंडाचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन मनोज सोलापूरे यांनी केले. यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतीचा इतिहास सांगताना म्हणाले की, या औद्योगिक वसाहतीची स्थापना १९९३ साली झाली. त्यावेळेस या संस्थेचे चेअरमन शरद आपा सोलापूरे हे होते. उपाध्यक्ष जगनाथ वैद्य तर सचिव रमेश येवले होते. १९९७ साली या संस्थेने २५ एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर या औद्योगिक वसाहतीचे चेअरमन शरद आपा सोलापूरे यांचे निधन झाले, तर सचिव रमेश येवले यांनी राजीनामा दिला. त्यांनतर चेअरमन म्हणून माझी व सचिव म्हणून मिलिंद नरखेडकर यांची निवड झाली. आम्ही दोघाने पुढे या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न हाती घेतले. या साठी आम्हाला तांत्रिक अडचणी आल्या. या साठी आम्हीं वारंवार प्रयत्न केला. तब्बल २५ वर्षांनी या औद्योगिक वसाहतीचे नामफलकाचे उद्घाटन आज दसऱ्याच्या मुहूर्तावर करून या भूखंडाचे प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.
या मध्ये गणेश शेटे, किरण रविंद्र लोंढे, नंदकुमार रामचंद्र तळेकर,इंदूमती विठ्ठल देवकर यांना भूखंडाचे वाटप केले. तसेच या वेळी शेअर्स व्होलडरला पण प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. तर ऊरलेले भूखंडाचे वाटप दिवाळीला करण्यात येईल असे मनोज सोलापूरे यांनी सांगितले.या वेळी केम ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
वसाहतीच्या नामफलकाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे व कुंकू कारखानदार रमेश येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, ऊपसरपंच नागनाथ तळेकर, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज सोलापूरे, डाॅ अंकुश तळेकर, ऐ.पी.ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटिल, धनजंय सोलापूरे, गोरख पारखे ऊमेश तळेकर सचिव मिलिंद नरखेडकर, पै,महावीर तळेकर,महेश तळेकर सर, नंदू तळेकर भास्कर लोंढे, प्रदिप शिंदे नागेश शेटे, बाळू मेहेत्रे, बाळासाहेब ननवरे, अवीनाश येवले, पिंकू गुरव, विठ्ठल देवकर, अप्पा वैद्य, भिल्ल साहेब, तानाजी पळसकर, शिवकर्ण येवले,कांबळे, गणेश शेटे, महादेव पाटमास आदि उपस्थित होते.
आम्ही केमच्या ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीचे नाव गेल्या १९९३ पासून ऐकत आलो आहे. तब्बल २५ वर्षांनी या औद्योगिक वसाहतीचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकारले आहे. केम औद्योगिक वसाहतीमध्ये माझा च उद्योग सुरू होतोय हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. याचा मला आनंद होत आहे. माझा सारख्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपणही या औद्योगिक वसाहतीमध्ये शेतीपूरक व्यवसाय करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा.
– नंदकुमार रामचंद्र तळेकर (उद्योजक,केम)