चिखलठाण येथील विवाहिता बेपत्ता
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण नं. १ (ता. करमाळा) येथील २४ वर्षाची विवाहिता बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी परिवारातील प्रतिनिधींनी करमाळा पोलीसात २ ऑक्टोबरला हरवल्याची तक्रार नोंदली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की ही २४ वर्षाची विवाहित तरुणी घरातून म्हणजे चिखलठाण नं. १ येथून बाहेर कामासाठी जाते म्हणून जी निघून गेली ती आली नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. तसेच तिच्या माहेरीही ती गेलेली नाही. त्यामुळे हरवल्याची तक्रार पोलीसात नोंदविण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.