आळजापूर येथील २१ वर्षाची युवती बेपत्ता - Saptahik Sandesh

आळजापूर येथील २१ वर्षाची युवती बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : आळजापूर (ता. करमाळा) येथील २१ वर्षाची युवती ही बेपत्ता झाली असून या प्रकरणी करमाळा पोलीसात २० ऑक्टोबरला हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सदरची तरूणी ही बाहेर कामासाठी जात आहे असे सांगून गेली ती परत आली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. या प्रकरणी पोलीसांनी हरवल्याची तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!