शेटफळ येथील नानासाहेब साळूंके यांना कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार प्रदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात शेटफळ येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब साळूंके यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री.साळूंके यांनी आपल्या शेतात पेरू,केळी ,सीताफळ पिकांमध्ये विविध प्रयोग करून या पिकात विक्रमी उत्पादन घेतले आहे.लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी व नागनाथ शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतमालाचे मार्केटिंगसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांना कृषीभूषण समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण जेऊर येथील भारत महाविद्यालयाचे प्रा.संजय चौधरी, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड डॉ बाबुराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे -पाटील, केमिस्ट असोसिएशनचे सचिन साखरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, विलासराव घुमरे, कल्याणराव साळूंके, वैभव पोळ, विजय लबडे महावीर निंबाळकर प्रशांत नाईकनवरे अशोक ढेरे, सुयोग झोळ, संजय हांडे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.