केम येथील आरोग्य सेवक शशिकांत ओहोळ यांचे निधन

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील शशिकांत प्रल्हाद ओहोळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ६१ होते.
केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक या पदावरून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांची ओळख शशिकांत मामा म्हणून होती. ते रुग्णाला चांगल्या प्रकारचे सेवा देत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.