दिपचंद कोठारी यांचे निधन – जेऊर येथे अंत्यसंस्कार
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मुळ केडगाव येथील रहिवाशी असलेले व जेऊर येथील खताचे व्यापारी असणारे दिपचंद कोठारी (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने उरळीकांचन येथे मुलाच्या घरी रात्री दीडच्या सुमारास निधन झाले आहे.
आज (ता. २) दुपारी बाराच्या सुमारास जेऊर येथील स्मशानभुमीत त्यांचे अंत्यंसस्कार करण्यात आले. ते अतिशय स्पष्ट वक्ते व दिलखुलास व्यक्तीमत्व असणारे व्यापारी होते. ग्राहकांशी त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. केडगाव येथील ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांची मुले चेतन कोठारी, स्वप्नील कोठारी आणि राजकुमार कोठारी तिघेही व्यावसायिक आहेत.
श्री. कोठारी यांचेवर जेऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जेऊर, केडगाव यासह विविध गावातील व्यापारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी व सभापती अतुलभाऊ पाटील तसेच व्यापारी संपतलाल राठोड यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.