करमाळा आगारातील बसचालक धनंजय सावंत सेवानिवृत्त…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा आगाराचे एस.टि.बस चालक धनंजय सावंत हे 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. श्री सावंत हे महाराष्ट्र एसटी कामगार सेना करमाळा आगाराचे अध्यक्ष होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कामगारांचे बरेचसे प्रश्न सोडवण्यास मदत केली आहे.
धनंजय सावंत यांनी गेली 33 वर्ष एसटीची अविरत सेवा केली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त करमाळा आगारातील एसटी डेपो मध्ये कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसटीतील चालक, वाहकासह कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होते.