स्व.बाळासाहेब ठाकरे यांना करमाळा तालुका शिवसेना युवा सेनेच्यावतीने अभिवादन.. - Saptahik Sandesh

स्व.बाळासाहेब ठाकरे यांना करमाळा तालुका शिवसेना युवा सेनेच्यावतीने अभिवादन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : हिंदूह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त तालुका शिवसेना युवा सेनेच्यावतीने करमाळा शहरातील जीन मैदान येथील युवासेना संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड विधान सभा संघटक संजय शिंदे शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

या प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख बंडू शिंदे, अ‍ॅड विकास जरांडे , युवासेना उपजिल्हा प्रमुख मयुर यादव, शहरप्रमुख समीर हालवाई, तालुका समन्वयक पांडुरंग ढाणे, आदि उपस्थित होते. या वेळेस शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी मनोगत व्यक्त केले.

केम येथील छायाचित्र

केम येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालयांत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी जेष्ट शिवसैनिक ह.भ.प. भुजंग तळेकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री हरी तळेकर, शहरं प्रमुख सतीश खानट, प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर, राहुल कोरे, ऊत्तरेश्वर गोडगे, अनिल तळेकर शिवाजी मोरे, दत्ता कांरडे, सुरेश शिंदे, रमेश तळेकर, हरिभाऊ तळेकर, ऊत्तरेश्वर टोणपे, नामदेव खंडागळे, कृष्णा तळेकर, सुभाष मोरे नितीन तळेकर दत्तात्रय तळेकर, विनोद मस्तुद शिवाजी तळेकर, आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!