स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्वातंत्र्य सैनिक साथी मनोहर पंत चिवटे यांच्या स्मरणार्थ आरोग्य क्षेत्रात जनजागृती पर लिखाण करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येत असलेला, यावर्षीचा मानाचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता चे मुंबई प्रतिनिधी संदीप आचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथे आयोजित अधिवेशनात देण्यात आला.
या सत्काराचे स्वरूप मानचिन्ह शाल श्रीफळ व 25000 रुपयांचा धनादेश असे होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे आमदार महेश लांडगे आमदार रोहित दादा पवार आमदार आदिती तटकरे पत्रकार मिलिंद भागवत विलास बडे अश्विन बापट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष विनोद जी जगदाळे रेश्मा साळुंखे अनुपमा खानविलकर निकिता पाटील मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख पत्रकार रवी आंबेकर समीर वावळणेकर आदीसह पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी करमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,
संदीप आचार्य हे दैनिक लोकसत्ता मधून सातत्याने आरोग्य विषयक लेखन करून जनजागृती करत आहेत त्यांनी निर्माण केलेले आणि अनेक प्रकल्प आरोग्य खात्याने स्वीकारलेले आहेत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून त्यांनी केलेला रोड मॅप महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आहे या सर्व त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्कारानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संदीप आचार्य यांना गेली मी तीस-पस्तीस वर्षापासून ओळखत असून त्यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे काम केले आहे आज मराठी पत्रकार परिषदेने आरोग्य विषयावर लिखाण करणाऱ्यांना पुरस्कार देणे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी वैद्यकीय सहाय्यता मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य क्षेत्रात जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्याची माहिती देऊन या पुढील काळात महाराष्ट्रातील कुठल्याही रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्प केला असल्याचे सांगितले.
आरोग्य क्षेत्रातील लिखाण अत्यंत महत्त्वाचे असून या लिखाणामुळे सर्वसामान्य अडचणीत असणाऱ्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन सल्ला व मदत मिळते
आजचा पुरस्कार खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी जे संवेदनशील म्हणून ओळखले जातात अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला यामुळे या पुरस्काराचा माझा दृष्टीने मला वेगळा अभिमान आहे. – संदीप आचार्य (पुरस्कार प्राप्त पत्रकार)