सय्यदभाई पत्रकार यांचे निधन…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली येथील रहिवासी तसेच जामा मशिदीचे विश्वस्त व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते कासम मोहम्मद सय्यद उर्फ सय्यदभाई पत्रकार (वय-६२) यांचे आज (ता.२०) दुपारी दोन वाजता ह्रदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. करमाळा शहरात हिंदू-मुस्लिम सलोखा ठेवण्यासाठी त्यांचा सतत पुढाकार होता. सय्यद भाई यांच्या संकल्पनेतूनच दरवर्षी शहरातील सर्व गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवर जामा मशिदीतून पुष्पवृष्टी ची पंरपंरा सुरु केली. सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद यांचे ते वडील होते. त्यांचे निधनाने मुस्लीम बांधव तसेच करमाळा शहरातील अनेकांनी दु:ख व्यक्त केले.