करमाळ्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौकात रिक्षा आडवी लावून अडथळा निर्माण करणाऱ्या एका रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शहरातील जीन मैदानासमोर करमाळा-पुणे रोडवर एका व्यक्तीने तीन चाकी रिक्षा वाहतुकीस अडथळा होईल व अपघात होईल अशा स्थितीत लावलेली होती.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ललित गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले की मी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री देवकर, पोलीस नाईक जगताप यांच्यासोबत करमाळा शहरात पेट्रोलिंग करत असताना, करमाळा शहरात पंजाब वस्ताद चौकात आलो असता, तेथे रिक्षा हा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत लावला होता, त्या रिक्षा चालक असल्याचे नाव विचारले असता त्याने पापा गणी मनियार (वय 37) रा,खडकपुरा करमाळा असे सांगितले तसेच शहरातील जीन मैदानासमोर करमाळा पुणे रोडवर एका व्यक्तीने तीन चाकी रिक्षा वाहतुकीस अडथळा होईल व अपघात होईल अशा स्थितीत लावलेली होती त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी आसिफ इकबाल तांबोळी (वय 36) रा,एसटी कॉलनी करमाळा असे सांगितले, या दोघांवरही करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.