रावगाव येथील दहा एकर ऊस शॉकसर्किट होवून जळून खाक - 20 ते 22 लाखांचे नुकसान - नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.. - Saptahik Sandesh

रावगाव येथील दहा एकर ऊस शॉकसर्किट होवून जळून खाक – 20 ते 22 लाखांचे नुकसान – नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार..

करमाळा (ता.20) : रावगाव (ता.करमाळा) येथील संतोष पांडुरंग जाधव गट नं.२८० मधील १० एकर ऊसाचे क्षेत्र विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे, यामध्ये एकूण पंधरा एकर ऊसापैकी पाच एकर ऊस वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे, उर्वरित दहा एकर ऊस आगी

त सापडला असून या शेतकऱ्याचे 20 ते 22 लाख रूपयांचे नुकसान झालेले आहे, सलग तीन वर्ष या भागातील ऊस इलेक्टीक विज वाहक ताराचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या घटना घडत आहेत, या भागात या घटना वारंवार घडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, सदर घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करून सदर झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!