करमाळा तालुक्यातील ३० ग्रा.पं.निवडणुकीचा सविस्तर निकाल - आपल्याच गटाचा सरपंच असल्याचे सर्वच गटाकडून दावे-प्रतिदावे.. - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील ३० ग्रा.पं.निवडणुकीचा सविस्तर निकाल – आपल्याच गटाचा सरपंच असल्याचे सर्वच गटाकडून दावे-प्रतिदावे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यापैकी लिंबेवाडी, अंजनडोह आणि वंजारवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अंजनडोह येथे फक्त एका जागेसाठी निवडणूक लागली होती. उर्वरित ग्रामपंचायतीचा २० डिसेंबर रोजी निकाल लागला आहे. या ग्रामपंचायत निकालात तरटगाव ग्रामपंचायतीवर आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. प्रदीप पाटील यांच्या गटाला सत्ता मिळाली असून, मोहिते-पाटील गटाचे डॉ.अमोल घाडगे यांच्या गटाचा पराभव झाला आहे.

तर वाशिंबे येथे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक तानाजीबापू झोळ यांच्या गटाची एकहाती सत्ता आली असून ते स्वतः सरपंच म्हणून २७० मतांनी निवडून आले आहेत. तर माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक नवनाथ बापू झोळ यांच्या पत्नी मनिषा झोळ यांचा दारूण पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपाचे अमोल पवार यांची मात्र समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवड झाली आहे. ३० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील आमदार शिंदे गट, माजी आमदार पाटील गट, माजी आमदार जगताप गट व बागल गट यांनी आपापल्या सोयीने ग्रामपंचायतीवर दावे केले आहेत.

अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर तालुक्यातील गट-तट बाजुला ठेवून निवडणूक लढविल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती या नेमक्या कोणत्या गटाच्या हे सांगणे कठीण आहे. तरीही या सर्व गटांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. आमदार शिंदे गटाने १५ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. त्यामध्ये पाच ग्रामपंचायती स्वबळावर तर दहा ठिकाणी युतीसह विजय मिळवल्याचे म्हटले आहे. बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये लिंबेवाडी आणि अंजनडोह या दोन ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.

टाकळी, पोफळज या ठिकाणी आमदार शिंदे गटाचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या ठिकाणी फक्त सरपंच पदाची निवडणूक लागली होती. पोफळज येथे कल्याण निवृत्ती पवार व टाकळी येथे रंजनाताई दोडमिसे हे सरपंच पदी निवडून आले आहेत. याबरोबरच त्यांनी वाशिंबे, खडकी, कुंभारगाव, पारेवाडी, कात्रज, पोमलवाडी, कोंढारचिंचोली, देलवडी, सोगाव, कामोणे आदी ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. तसेच उर्वरित वरकटणे, जिंती, हिंगणी या ठिकाणी सरपंच पद मिळाले नसून, त्यांचे सदस्य निवडून आले आहेत. या सर्व सदस्य व सरपंच यांचा सत्कार सरपंच चंद्रकांत सरडे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास निमगिरे, माजी सदस्य विलास पाटील, माजी सरपंच सुभाष अभंग यांनी सत्कार केले आहेत.

माजी आमदार नारायण पाटील गटाने १९ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. वरकटणे, गोयेगाव, हिंगणी, शेलगाव, जिंती, पोंधवडी, अंजनडोह, वंजारवाडी, कामोणे, दहिगाव, दिवेगव्हाण, रिटेवाडी, तरटगाव, मोरवड, सोगाव, विहाळ, भिलारवाडी, पोफळज व पारेवाडी या गटावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या गावातील सर्व सरपंच व सदस्यांचा जेऊर ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार नारायण पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, की तालुक्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आजही कायम आहे, हे आज झालेल्या ग्रामपंचायत निकालातून स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकीत आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगले यश मिळवले आहे. आगामी कालावधीत या सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आरोग्य, रस्ते, स्वच्छता, कृषी, शिक्षण आदी अनेक मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू; असे सांगितले.

माजी आमदार बागल गटाने १४ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. यामध्ये दिवेगव्हाण, कोंढारचिंचोली, हिंगणी, कुंभारगाव, खडकी, तरटगाव, मांजरगाव, मोरवड, रिटेवाडी या नऊ ठिकाणी एकहाती सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर वंजारवाडी, लिंबेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. शिवाय अंजनडोह, पोफळज, खातगाव या ठिकाणी युती करून सत्ता स्थापन झाल्याचा दावा केला आहे.

खातगाव येथे बाजार समितीचे संचालक औदुंबर मोरे यांच्या पत्नी रसिका मोरे यांचा सरपंच पदासाठी पराभव झाला आहे, तर पाटील गटाच्या सुवर्णा मोरे या विजयी झाल्या आहेत. पोंधवडी येथे पाटील गटाचे मधुकर कोडलिंगे हे विजयी झाले आहेत. गोयेगाव येथे पाटील गटाच्या उज्वला माळशिकारे या विजयी झाल्या आहेत. कुंभारगाव येथे सुनिता पोळ या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. विहाळ येथे पाटील गटाने वर्चस्व ठेवले आहे. सोगाव येथे बागल व पाटील गटाचे विशाल सरडे हे सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. या ठिकाणी स्वप्नील गोडगे यांचा पराभव झाला आहे. भिलारवाडी येथे ॲड. अशोकराव गिरंजे यांचे नेतृत्वाखाली सत्ता आली आहे.

जिंती येथे जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचे पॅनलने वर्चस्व कायम ठेवले आहे. या ठिकाणी ॲड. नितीन राजेभोसले यांना दोन जागा मिळाल्या आहेत. दिवेगव्हाण येथे माधुरी खाटमोडे या सरपंच झाल्या आहेत. पोमलवाडी येथे आमदार शिंदे गटाचे सुर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच निवडला आहे. कोंढारचिंचोली येथे बागल गटाचे शरद भोसले हे सरपंच पदी विजयी झाले आहेत. वरकटणे सरपंच पद पाटील गटाकडे तर अन्य सदस्य बागल गटाचे निवडून आले आहेत. शेलगाव वांगी येथे पाटील गटाची एकहाती सत्ता आली आहे. पारेवाडी येथे मकाईचे व्हा.चेअरमन बाळासाहेब पांढरे यांच्या गटाला हादरा बसला असून, गेल्या ४० वर्षाची सत्तेची परंपरा खंडीत झाली आहे. या ठिकाणी नवले गटाला यश आले असून, वंदना नवले या विजयी झाल्या असून उज्वला पांढरे यांचा पराभव झाला आहे. तरटगाव येथे मोहिते-पाटील समर्थक डॉ. अमोल घाडगे यांना केवळ दोन जागा मिळाल्या आहेत तर डॉ. प्रदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली आमदार शिंदे, माजी आमदार जगताप, बागल व पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.

या ठिकाणी डॉ. पाटील यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या असून सरपंच पदही त्यांचेकडे आले आहे. या ठिकाणी उद्योजक सुदाम लेंडवे यांचा पराभव झाला आहे. खडकी ग्रामपंचायतीमध्ये पाटील शिंदे-बागल जगताप व भाजपाचे उमेदवार चंद्रकला बरडे या विजयी झाल्या आहेत. अंजनडोह येथे एका सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रभाकर माने हे विजयी झाले आहेत. हिंगणी येथे संतोष बाबर हे सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. या ठिकाणी आमदार शिंदे गटात बंडखोरी होऊन सरपंच पदासाठी चार उमेदवार उभे राहिले होते. त्यात बाबर यांनी बाजी मारली आहे.

टाकळी ग्रामपंचायतीमध्ये बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांचे नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत रंजना दोडमिसे या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. कामोणे येथे बागल गटाला हादरा बसला असून, या ठिकाणी बागल गटा विरूध्द पाटील-शिंदे-जगताप गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. या निवडणूकीत रमेश खरात हे सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. या ठिकाणी विरोधी बागल गटाला मात्र एकही जागा मिळवता आली नाही. रिटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आमदार शिंदे व माजी आमदार पाटील गट युतीचे लता किशोर रिटे या सरपंच पदी विजयी झाल्या आहेत. त्या प्रगतशील बागायतदार सर्जेराव रिटे यांच्या सुन तर वडगाव येथील माजी सरपंच व जुनेजाणते राजकारणी नामदेव शेगडेमामा यांची कन्या आहेत. या ठिकाणी विद्यमान सरपंच दादासाहेब कोकरे यांचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्यांचे नावे व मिळालेली मते खालीलप्रमाणे…

ग्रामपंचायत तरटगाव

सरपंच रजनी महावीर जगदाळे (३३७)

सदस्य – श्रीनाथ दिलीप घाडगे (१४५), अनुजा वसंत जाधव (१७४), ज्योती हरिदास मोरे (१६१), धनराज केशवराव मोरे (९१), रेखा पांडूरंग बावडकर (९२), अभिजीत प्रदीप पाटील (१०९), रजनी महवीर जगदाळे (१००)

ग्रामपंचायत टाकळी

सरपंच रंजना सुग्रीव दोडमिसे (११७६) बिनविरोध

सदस्य पंचशिला संतोष रणदिवे, निता दत्तात्रय लाळगे, नितीन आजिनाथ इरचे, रतिलाल पोपट करचे, प्रियंका अमोल हेडे, साधना सुरेश गोडसे, गणेश सुरेश कोकाटे, हरी अंबादास गुळवे, सुवर्णा दिगांबर जाधव

ग्रामपंचायत विहाळ

सरपंच पुजा मोहन मारकड (६३४)

सदस्य – शिवाजी पोपट नाळे (३५९), अनुसया अंकुश कांबळे (३०८), पार्वती संजय भुजबळ (बिनविरोध), जयराम बापू कांबळे (२०७), प्रदीप धनराज हाके (१९९), द्रौपदी हरिदास कायगुडे (१९८), गणेश बाळू मारकड (२३९), रेश्मा ज्ञानेश्वर देवकाते (२११, चिठ्ठीद्वारे निवड), अश्विनी संजय चोपडे (२८०)

ग्रामपंचायत वंजारवाडी (बिनविरोध)

सरपंच प्रतिक्षा प्रविण बिनवडे

सदस्य – आशाबाई भरत राख, आबासाहेब गोकुळ राख, सुदामती रत्नाकर केकान, अक्काबाई विलास वाघमोडे, विनोद मारूती केकान, अजय हरी खाडे, रूपाली परमेश्वर बिनवडे

ग्रामपंचायत वाशिंबे

सरपंच तानाजी रामदास झोळ (७६२)

सदस्य– तुकाराम भगवान डोंबाळे (३५१), प्रिया अजित रणदिवे (२७९), माया रामदास झोळ (२९४), अमोल लालासाहेब पवार (३३४ चिठ्ठीद्वारे निवड), वैशाली विजय पाटील (३७१), शोभा शहाजी शिंदे (३०२), श्रीहरी भारत टापरे (३५८), शिवराज हनुमंत झोळ (३४१), रूपाली धोंडिराम कळसाईत (३९३)

ग्रामपंचायत अंजनडोह

बिनविरोध सरपंच पल्लवी अमोल शेळके

बिनविरोध सदस्य – विमल श्रीरंग रणदिवे, सुदामती धोंडिराम उर्फ धोंडिबा शिंदे, उध्दव ज्ञानदेव गावडे, सुरेखा राजेंद्र सरतापे, कालिदास किसन ढेरे, सुमन गणपत पन्हाळकर, कचरदास भिवाजी रणदिवे, मनिषा देविदास शिंदे, प्रभाकर दशरथ माने (२४९)

ग्रामपंचायत भिलारवाडी

सरपंच – द्वारकाबाई नवनाथ अंबोधरे (६३२) सदस्य – उज्वला विश्वास उगलमोगले (२३३), बजरंग काशिनाथ गिरंजे (२०७), आदिका कांतीलाल गिरंजे (२३५), किसन भाऊसाहेब धावडे (२३९), गंगाराम कांतीलाल माने (१९८), शैला बाळासाहेब काटे (१९४), आजिनाथ मारूती पानगे (२१०), शालन भागवत वालेकर (२१८), स्वाती ज्ञानेश्वर येडे (२१३)

ग्रामपंचायत देलवडी

सरपंच रेखा सुनिल ढवळे (३७७)

सदस्य अतुल पोपट काळे (२०४), चंद्रभागा दत्तू पवार (१९०), शेषाबाई दादा शिंदे (१७७), सुनिल सोमनाथ शितोळे (९८), आकांक्षा संतोष चव्हाण (बिनविरोध), विठ्ठल मारूती ढवळे (११२), सरस्वती देवराव चाकणे (बिनविरोध)

ग्रामपंचायत दिवेगव्हाण

सरपंच– माधुरी हनुमंत खाटमोडे (४४८)

सदस्य – सविता सोमनाथ शिंदे (१७०), दिपाली वैजीनाथ खाटमोडे (१७९), गीता अमोल पाडुळे (१६०), विराज आबासाहेब मोरे (१३५), पातरबाई कालिदास खाटमोडे (१४६), भाऊसाहेब शिवाजी बागल (१४६), उषा शरद खाटमोडे (१४६)

ग्रामपंचायत हिंगणी

सरपंच संतोष संभाजी बाबर (२८७)

सदस्य राहूल बाळासाहेब बाबर (१३१), मंगल पांडूरंग गायकवाड (१३०), ज्योती संतोष जाधव (१३३), मयुर महादेव बाबर (७४), पंचगंगा जयकुमार गलांडे (९४), प्रशांत आबासाहेब बाबर (१२८), रोहिणी हनुमंत पाटील (१४६)

ग्रामपंचायत जिंती

सरपंच– सुनिता सुनिल ओंभासे (९०४)

सदस्य सागर विनायक भोसले (२३३), पल्लवी आकाश धेंडे (३००), जनाबाई दामोदर वारगड (२७५), दत्तात्रय महाळू गायकवाड (३०८), भारती बलभिम धेंडे (२९७), लता केशव पोटे (३१८), रमेश संभाजी धेंडे (२८५), उमेश राजू शेलार (२७०), किर्तीमालिनी उमाजीराव राजेभोसले (२९६)

ग्रामपंचायत कामोणे

सरपंच रमेश राजाराम खरात (७५२)

सदस्य संजय साहेबराव भिसे (२८६), रूपाली पंकज नलवडे (३४२), शोभा महेंद्र भालेराव (२७६), सुहास मच्छिंद्र जाधव (२११), अश्विनी संतोष नलवडे (२२६), गणेश सहदेव शिंदे (१९८), सारीका बाळू शिंदे (२०९)

ग्रामपंचायत कात्रज

सरपंच सुनिता मनोहर हंडाळ

सदस्य – गोविंद शंकर शेंडगे (१८६), अलका सतीश कवडे (२१३), सुनिता भारत शिंदे (बिनविरोध), लक्ष्मण वसंत धायगुडे (१७६), राजश्री श्रीरंग यादव (१७०), सोपान ब्रह्मदेव शिंदे (२५६), कोंडाबाई सिद्राम माने (२८२)

ग्रामपंचायत खडकी

सरपंच चंद्रकला उमाकांत बरडे (७४८)

सदस्य – अंगद दादासाहेब शिंदे (३२०), सहदेव राजाराम नागटिळक (बिनविरोध), संगीता मच्छिंद्र विहाळे (बिनविरोध), भाऊसाहेब बबन खरात (बिनविरोध), रसिका कृष्णा नागटिळक (बिनविरोध), पार्वती सर्जेराव जाधव ( बिनविरोध), अशोक दादासाहेब देशमुख (२३९), सोनाली बाळासाहेब सुळ (बिनविरोध), संजना महादेव खरात (बिनविरोध)

ग्रामपंचायत खातगाव

सरपंच– सुवर्णा अविनाश मोरे (४७४)

बिनविरोध सदस्य – गणेश नामदेव कोकरे, कौशल्या वसंत रणसिंग, तेजश्री राजेंद्र कोकरे, दत्तात्रय लक्ष्मण कोकरे, कांता बापू सोनवणे, साधना गोरख काटे, दादा जगन्नाथ झेंडे (१६३)

ग्रामपंचायत कोंढारचिंचोली

सरपंच– शरद नाथसाहेब भोसले (५३७)

सदस्य – श्रीराम कांतीलाल गलांडे (१९४), मृणालिनी मनोहर लांडगे (१८५), मीना नवनाथ साळुंखे (बिनविरोध), ज्ञानेश्वर चंद्रकांत गलांडे (२३९), राणी रविंद्र खांडेकर (२८२), गणेश वसंत धांडे (१०५), सुनिता दिलीप कांबळे (१२०)

ग्रामपंचायत कुंभारगाव

सरपंच सुनिता रामदास पोळ (७८४) –

सदस्य – मच्छिंद्र शंकर पानसरे (३२८), काजल राहूल पानसरे (३६२), सारीका दत्तात्रय भालेराव (बिनविरोध), मारुती काशिनाथ कुंभार (१४०), किर्तीबाला नानासाहेब आढाव (१४९), रतन वामनराव आढाव (१३५), आजिनाथ रामदास गायकवाड (३०७), जनार्धन भिकाजी भोसले (२८५), सरस्वती बबन राऊत (३०१ )

ग्रामपंचायत लिंबेवाडी (बिनविरोध)

सरपंच किरण चंद्रकांत फुंदे

सदस्य– सिंधू बाळू जायभाय, महादेव पांडूरंग फुंदे, ज्ञानेश्वर हौसराव साबळे, बाळू अंकुश जायभाय, अंजना भास्कर सानप, गोदाबाई रामदास गोरे, मनिषा गोरख शिंदे

ग्रामपंचायत मोरवड

सरपंच रामहरी बापू कुदळे (९२१)

सदस्य भरत जालिंदर नाळे (२४७), अश्विनी दादासाहेब कुदळे (२८२), मनिषा बाळकृष्ण कांबळे (बिनविरोध), मनिषा योगेश दिवटे (२९१), सुरेखा नेमचंद मोहोळकर ( २५८), हनुमंत आजिनाथ नाळे (बिनविरोध), लालासाहेब विश्वनाथ नाळे (३१४), कांतीलाल सुभाष काळे (२९७), सुमन राजेंद्र नाळे (२८९)

ग्रामपंचायत पारेवाडी

सरपंच– वंदना हनुमंत नवले (७६१)

सदस्य गणेश नवनाथ खोटे (२८४), बापूसाहेब भारत मोरे (२५५), सुनिता सुशिलकुमार सरवदे (२५६), महादेव विठ्ठल पांढरे (२४२), शकुंतला सुभाष गरूड (२५१), क्रांती महादेव देशमुख ( २४८), संतोष अशोक शिंदे (३५९), इंदुबाई नामदेव सोनवणे (३६९), कौशल्या मधुकर गुंडगिरे (३६०)

ग्रामपंचायत पोफळज

सरपंच कल्याणराव निवृत्ती पवार (१३७१)

बिनविरोध सदस्य – राणी बिभिषण गव्हाणे, रेखा गौतम कांबळे, ज्योतीराम अनिल गोळे, जया शहाजी पवार, बिभिषण हंबीरराव पवार, सुमन लक्ष्मण सुरवसे, रविंद्र देविदास कांबळे, आप्पाराव तुकाराम हजारे (३५२), कुसूम बबन हजारे (३५०)

ग्रामपंचायत पोमलवाडी

सरपंच– नवनाथ मल्हारी गायकवाड (३६१ )

सदस्य– मीनाक्षी लक्ष्मण फडतरे (३२७), उमा संजय फडतरे (२०२), महादेव वसंत हुलगे (बिनविरोध), विलास मोहन काळे (बिनविरोध), गौरी नितीन आरडे (बिनविरोध), किशोर लक्ष्मण घाडगे (८२), छाया रमेश नवले (८१)

ग्रामपंचायत पोंधवडी

सरपंच– मनोहर बाबासाहेब कोडलिंगे (४५९)

सदस्य- अक्षय अप्पा भिसे (२०४), शालन जवान भिसे (२०२), कांताबाई भागवत गाडे (२२६), विशाल धोंडिराम अनारसे (१३६), मनिषा सुरेश कांबळे (१३८), शालन कांतीलाल जगदाळे (१५६), रामदास गोपीनाथ गाडे (१८१), बिभिषण आजिनाथ हुलगे (१८३), संगीता रघुनाथ क्षीरसागर (२०६ )

ग्रामपंचायत शेलगाव (वां)

सरपंच– लता महादेव ठोंबरे (१४७०)

सदस्य– दत्तात्रय बाळकराम केकान (२९०), मंगल प्रविण पवळ (२७७), भगवान गणपत पोळ (४११), वसंत आजिनाथ केकान (४०२), सुशिला भारत पोटे (४४७), दौलत सायबु पवार (३२७), मिरा आबासाहेब चिंचकर (३८०), सावित्रा विठ्ठल कोंडलकर (३२३), समाधान विष्णू जाधव (३४९), वर्षा अमित केकान (३१३), पुष्पा धनंजय काटे (३३३)

ग्रामपंचायत सोगाव

सरपंच– विशाल विश्वनाथ सरडे (१०३९)

सदस्य – हरिचंद्र संभाजी भोसले (४१७), प्रविण उत्तम सरडे (४०५), दिपाली नागेश पवार (४१८), कृष्णा ज्ञानदेव गोडगे (२६४), कोमल विकास भोसले (२९४), कमल नारायण नगरे (२६४), विठ्ठल बळीराम गोडगे (३३७), शारदाबाई आप्पासाहेब सरडे (३६४), बायडाबाई केरबा निकत (३१०)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!